मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामुळे 'रामलीला' आयोजनातील अडथळे दूर

    24-Sep-2024
Total Views |
cabinet minister mangal prabhat lodha

 
मुंबई :  कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने मुंबईमधील सर्व रामलीला मंडळांना आपले प्रश्न मांडण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मंगळवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सर्व रामलीला मंडळांच्या प्रश्नासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काही महत्त्वाचे निर्देश दिले. त्यामुळे रामलीला उत्सवाचे आयोजन आता अधिक सोपे होणार आहे.

रामलीला मंडळांना सलग पाच वर्षांपर्यंत परवानगी देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच रामलीला मंडळांना फायर ब्रिगेड, पोलीस परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टिम, ऑनलाईन सिस्टीम उपलब्ध असणार आहे. फायर ब्रिगेडचे शुल्क सुद्धा माफ करण्यात आले असून, मुंबई महापालिकेच्या मैदानांचे भाडे सुद्धा अर्धे करण्यात आले आहे. या शिवाय येणाऱ्या भाविकांसाठी या मैदानांवर पायाभूत सुविधा, प्रकाश योजना तसेच प्रसाधन सुविधा सुद्धा महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.



विना निर्बंध उत्सव साजरे होणार!

"आज बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व रामलीला मंडळांच्या समस्या आम्ही ऐकून घेतल्या आणि त्यांच्या मागण्यांना आम्ही होकार दिला आहे. महायुतीचे सरकार आल्यापासून कोणतेही जाचक निर्बंध न लादता सर्व सण साजरे केले जातात. त्या अनुषंगानेच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी ज्याप्रमाणे सर्व सुविधा दिल्या, त्याचप्रमाणे रामलीला मंडळ आणि नवरात्री मंडळांना सुविधा देण्यात येणार आहेत", अशी प्रतिक्रिया मंगल प्रभात लोढा यांनी दिली.