स्वरा भास्करचा पती मविआतर्फे निवडणूक लढवणार?

    24-Sep-2024
Total Views | 113
 
Fahad Ahmad
 
मुंबई : अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहद अहमद हे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून फहद अहमद विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूकांचं पडघम वाजेल. विधानसभा निवडणूकीकरिता महायूती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटप सुरु आहे. अशातच आता अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहद अहमद हे सुद्धा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
 
हे वाचलंत का? -  "पोलिसांच्या जीवावर उठलेल्या बलात्काऱ्याविषयी विरोधकांना..."; मंत्री मुनगंटीवारांची टीका
 
मिळालेल्या माहितीनुसार, फहद अहमद हे अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. याठिकाणी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आमदार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा नवाब मलिकांना संधी देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर फहद अहमद हे समाजवादी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने अणुशक्तीनरची जागा मागितल्याची चर्चा आहेत.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121