मुंबई : बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ एकांकिका विभाग आयोजित ‘आंतरआगार एकांकिका स्पर्धा २०२४’ ची अंतिम फेरीचा निकाल आज जाहीर होणार आहे. हिंदवी प्रपातो कोसळावा, बेडूक रमी आणि तुम्ही, जब वी मेट, आधे अधुरे, डेली सोप, फोबिया, तिचे संदर्भ नसलेली गोष्ट, कापुर, फ्लाईंग राणी या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. भायखळा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात या स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडणार आहे. अनेक वर्षांपासून बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करत आहे.