मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन यंदा १०० नाही तर ७० दिवसांत संपणार आहे. सध्या 'बिग बॉस'च्या घरातील प्रत्येक स्पर्धकांवर प्रेक्षकांची करडी नजर आहे. नुकताच अरबाज पटेल घरातून बाहेर पडला होता. आणि आता त्याच्याचबदद्दल एक चर्चा सुरु झाली आहे. संभाजीनगरचा असलेला अरबाज पटेल याने 'बिग बॉस'च्या घरात जेव्हा छत्रपती शिवरायांचा जयजयकार झाला, तेव्हा अरबाज मात्र हाताची घडी घालून शांत उभा होता. यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरबाजने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजला विचारले होते की"पुरुषोत्तम दादा पाटील यांनी 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर जाताना छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या नावाचा जयजयकार केला. तेव्हा संभाजीनगरचा अरबाज काहीच बोलला नाही. तेव्हा महाराष्ट्र नाराज झाला. ही महाराष्टाराची नाराजगी तुला दूर करायची आहे का?. यावर अरबाज म्हणाला की, “मी आपण हे जाणूनबूजन केलं नाही”.
पुढे तो म्हणाला की, "पहिले तर खरं सांगतो, असं काही घडलं हेच मला माहिती नाही. कारण मी तसा नाही आहे. संभाजी नगरमध्ये मी राहतो. आपण आज महाराजांच्यामुळेच आहोत, त्यांच्यासोबत आपण काम केलंय, तेव्हा जी माणसं होती, त्यांनी महाराजांच्या पाठीला पाठ लावून काम केलं आहे. तिकडे काय सुरू होतं, हे सगळं कधी घडलं मी ऐकलंच नाही. कारण, पुरुषोत्तम दादांना मीच नॉमिनेट केलेलं होतं. त्यामुळे तो एक विचार माझ्या मनात सुरू होता".
पुढे तो म्हणाला की, "धर्म धरून राहिलो असतो तर मी मराठी बिग बॉसमध्ये आलोच नसतो. अरे ते मराठी बिग बॉस आहे मला नाही जायचं तिकडे, मी हेच सांगितलं असतं. पण मी तसा व्यक्ती नाहीये. मी सगळ्याच धर्माचा आदर करतो. तसं काही नाहीये. जर लोकांना तसं वाटलंय तर मी सर्वांची माफी मागतो तुमची. पण खरंच असं काही नाही आहे".