मुंबई : लक्झरी व्हिला रेंटल कंपनी स्टेयस्टा आगामी काळात आयपीओ लाँच करण्याची योजना आखत आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६०० कोटी रुपयांची भांडवल उभारणी करावयाची आहे. २०२८ पर्यंत कंपनी आयपीओ लाँच करण्याची योजना आखत असून ६०० कोटींच्या आसपास कंपनीचे महसूल लक्ष्य असणार आहे. लक्झरी व्हिला भाडे क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी स्टेवीस्टा लवकरच आयपीओ आणणार आहे.
दरम्यान, कंपनी सध्या देशभरात १ हजार मालमत्ता हाताळत असून पुढील अडीच वर्षांत २ हजार ५०० व्हिलापर्यंत पोर्टफोलिओ वाढवण्याची त्यांची योजना आहे. आर्थिक वर्ष २४ मध्ये १४० कोटी रुपयांचा महसूल कंपनीने मिळविला असून पहिल्या तिमाहीत EBITDA कामगिरीदेखील सकारात्मक आहे. ४२.२ कोटी रुपयांचा महसूल आणि १ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
आम्ही गेल्या सात वर्षांत केवळ ३० कोटी रुपयांच्या भांडवलासह अत्यंत भांडवली कार्यक्षमता दाखवली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी १९६ कोटी रुपयांचा महसूल आणि ४ कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे, असे स्टेविस्टाचे सह-संस्थापक अमित दमानी म्हणाले. भारतातील सुट्टीच्या मोसमातील भाडे बाजार २०२४ पर्यंत २.१२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून २०२९ पर्यंत ८.७२ टक्के वार्षिक वाढीसह ३.२२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.