"...तर रक्ताचे पाट वाहतील!", आरजी कर प्रकरणात भाजप नेत्याचा इशारा

    23-Sep-2024
Total Views |

RG Kar Medical case
 
कोलकाता : आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील (RG Kar Medical case) बलात्कार हत्याप्रकरणी भाजप नेते सुवेंदू अधिकारींनी स्फोटक दावा केला आहे. तृणमूल काँग्रेसचा एक नेता पीडितेचा तोतया काका बनून पीडितेच्या मृतदेहाच्या विच्छेदनावेळी आल्याची माहिती सुवेंदू यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी विच्छेदनावेळी घाई केली असा दावा सुवेंदू यांनी केला आहे. सीबीआय चौकशीच्या प्रकरणातून समोर आलेल्या डॉक्टरांचा हवाला देत सुवेंदूंनी सांगितले.
 
सुवेंदूंनी ट्विट करत यामागील दडलेली माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, पीडितेचा काका असल्याचा दावा करणारा एक व्यक्ती होता. याप्रकरणी शवविच्छेदन पूर्ण न झाल्यास रक्ताचे पाट वाहतील असे वक्तव्य केले.
 
 
 
सुवेंदू अधिकारी म्हणाले की, ही व्यक्ती तृणमूल काँग्रेसचे नेते असून माजी नगरसेवक आहेत. संजीब मुखर्जी हे तृणमूल काँग्रेस येथे सामील झाले आहेत. तसेच ते आता पाणिहाटीचे तृणमूल काँग्रेसचे आमदार निर्मल घोष यांचे निकटवर्तीय आहे.
 
पीडितेच्या अंत्यसंस्कारावेळी घाई करण्याचा आरोप सुवेंदू यांनी केला. डॉक्टरांनी अंतिम संस्कारावेळी स्थानिक आमदार निर्मल घोष हे स्मशानभूमीत उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले, अधिकाऱ्याने सांगितले की, घोष यांना हा आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकड़ून मिळाला होता, असा दावा सुवेंदूंनी केला होता.