क्रूर ! चॉकलेट देण्याच्या बहाण्याने मौलवीने ५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण

23 Sep 2024 15:35:37
 
Minor sexual abuse
 
जयपूर : राजस्थानातील अलवर जिल्ह्यात एका ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना आहे. असजद या मौलवींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेला मौलवीने चॉकलेट देऊन हे कृत्य केल्याचे तक्रारीत सांगितले गेले आहे. पीडितेला मशीदीत बोलावून तिला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने २२ सप्टेंबर रोजी मौलवीला अटक केली.
 
प्रसारमाध्यमानुसार, ही घडलेल्या घटना अलवार येथील आहे. राजगड पोलीस ठाणे परिसरातील ही घटना असून रविवारी ५ वर्षीय एका युवलतीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या घरासमोर मशीद असून यावेळी मौलवीने पीडितेला चॉकलेट देतो असे आमिष दाखवून तिचे लौंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.
 
 
यावेळी पीडितेने आरडाओरड केल्याने घडलेली घटना उघडकीस आली. पीडितेची आई मशिदीत पोहोचली असता मौलवी तिच्यावर बलात्कार करत होता. पीडितेची आई मशीदीत पोहोचताच घटनास्थळारून पळ काढला. दरम्यान, पीडितेच्या आईने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. यावेळी असजाद खान हा फरार झाला. दरम्यान, पीडितेला रूग्णालयात दाखल करण्यात आले.
 
मौलवी असजद खान हा मूल राजस्थानातील भरपूरचा आहे. गेल्या २ वर्षांपासून तो अलवरच्या मशीदीत राहत होता. पोलिसांनी मौलवी असजदवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अखेर पोलिसांनी यश मिळाले असून कायदेशीर कारवाई केली.
 
 
Powered By Sangraha 9.0