१४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नामकरणास मंत्रिमंडळाची मंजुरी- कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा

    23-Sep-2024
Total Views |

lodha min
 
 
मुंबई, २३ सप्टेंबर : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यातील १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण होणार असल्याची घोषणा केली. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना कोणत्याही प्रकारची नावे नाहीत. त्या अनुषंगाने १४ औद्योगिक संस्थांचे नाव बदल व्हावे यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यतील १४ शासकीय औद्योगिक संस्थांना थोर समाजसुधारकांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली असल्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. उर्वरित शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याबाबत नागरिकांच्या सूचना लक्षात घेतल्या जातील. नागरिक आपल्या सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडे सुपूर्द करू शकतात असे देखील मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

नावात बदल झालेल्या औद्योगिक संस्थांची माहिती खालीलप्रमाणे.

१. औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे - धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठाणे
२. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई - १ - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई-१
३. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि अहमदनगर
४. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड - कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड, जि बीड
५. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर - भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि पालघर
६. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि. नाशिक- महात्मा ज्योतिबा फुले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, नाशिक
७. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर
८. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती - संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था अमरावती
९. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली
१०. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव - कवयत्री बहिणाबाई चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
११. औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, जि. वर्धा - दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आर्वी, जि वर्धा
१२. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई - दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई
१३. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई - महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई
१४. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव - आचार्य विद्यासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि धाराशिव