रेल्वे रूळावर गॅस सिलिंडर ठेवत घातपाताचा रचला कट

22 Sep 2024 17:07:41
 
Railway Jihad
 
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील देहाट जिल्ह्यात रेल्वे रूळावर गॅस सिलिंडर ठेवत रेल्वे जिहाद करण्याचा कट होता. संबंधित रेल्वे चालकाने रेल्वे रूळावरील गॅस सिलिंडर पाहताच आपत्कालीन ब्रेक लावत प्रवाशांचा जीव वाचवला आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घडलेल्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
 
ही घटना प्रेमपूर शहराजवळ घडली असून उत्तर रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठींनी या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, रविवारी २२ सप्टेंबर रोजी प्रयागराज विभागात प्रेमपूर येथे रेल्वे स्थानकाठिकाणाहून मालगाडी जात होती. तेव्हा पायलटच्या लक्षात आले की, रूळावर सिलिंडर पडलेला आहे. सिलिंडरचा आकार हा ५ लिटर एवढा आहे. पायलटने तात्काळ अपत्कालीनवेळी ब्रेक लावून रेल्वे थांबवली. यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
 
 
 
यावेळी घटनास्थळी असलेल्या रेल्वे रूळावरील गॅस सिलिंडरबाबतच्या घटनेची माहिती रेल्वे चालकांनी नियंत्रण कक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच आरपीएफ जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जवानांनी सिलिंडर हटवला. याप्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याची माहिती सांगितली आहे. यामागे नक्की कोण आहे? घटनास्थळावरील सीसीटीव्हीचे फूटेज तपासले जात आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0