साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हात झळकणार छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा

    20-Sep-2024
Total Views |
 
bodhchinha
 
 
मुंबई : दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड अखेर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पारंपरिक लेखणी असलेले बोधचिन्ह राज ठाकरे यांनी निवडले आहे.
 
यावर्षी दिल्ली मध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजक ‘सरहद’ संस्थेतर्फे संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेत पाठवल्या गेलेल्या बोधचिन्हांमधून साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह निवडण्याची जबाबदारी सरहद संस्थेने राज ठाकरे यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार राज ठाकरे यांनी लोणी काळभोर येथील ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटि अँड आर्ट’चे संचालक प्रसाद गवळी यांनी तयार केलेले बोधचिन्हाची निवड केली आहे. निवड झालेले बोधचिन्ह तयार करणाऱ्या प्रसाद गवळी यांचा साहित्य संमेलनात सत्कार केला जाणार आहे.