Teacher of the Year 2023-24 पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यास सुरुवात!

20 Sep 2024 20:24:57

Award

 
मुंबई (Teacher of the Year 2023-24) : ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट (आयएमडीपीसीटी) यांच्या वतीने शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन कार्य करणाऱ्या शिक्षकांकडून वेगवेगळ्या श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. 'टीचर ऑफ इअर २०२३-२४' या शीर्षकाअंतर्गत वेगवेगळ्या विषयवार शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. उत्कृष्टपणे अध्यापनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. मुंबई जिल्हा को.ऑप हाऊसिंग फेडरेशनचे संचालक विशाल कडणे यांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील कार्यरत शिक्षक मान्यवरांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. याचाच पुढचा टप्पा म्हणजे 'टीचर ऑफ इअर' पुरस्कार सोहळा आहे.

Image123 
 
विशाल कडणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात सर्व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना 'लाईफ टाईम अचिव्हमेंट' पुरस्कार, महाविद्यालयीन शिक्षकांना 'प्रिन्सिपल ऑफ द इअर' पुरस्कार, सर्व तांत्रिकी विभागाच्या शिक्षकांना ' लेक्चर ऑफ द इअर' पुरस्कार, याव्यतिरिक्त कला, हस्तकला, संगीत, नाट्य या विषयातील शिक्षकांना 'हेड टिचर ऑफ द इअर' पुरस्कार, सर्व वैद्यकीय विभागात 'बेस्ट स्कूल ऑफ द इअर' पुरस्कार, वनस्पतिशास्त्र, प्राणीशास्त्र,विज्ञान, पर्यावरण विभागात 'बेस्ट कॉलेज ऑफ द इअर' पुरस्कार, सर्व अभियांत्रिकी विभागातील शिक्षकांना 'रिटायरमेंट रेकीगनेशन अवॉर्ड' या श्रेणीअंतर्गत पुरस्कार दिला जाणार आहे. तरी या पुरस्कारासाठी आपल्याला प्रस्ताव पाठवायचे असल्यास आपण या क्रमांकावर संपर्क साधू शकता. विशाल कडणे - ९५९४०२०८८८, मयंका भुर्के- ८६५२२६८६३९
 
 
Powered By Sangraha 9.0