मौलवी शब्बीर रजाकडून ५ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

20 Sep 2024 17:27:33
 
 Minor Sexual Girl
 
डेहराडून : उत्तराखंडच्या रूद्ररूप येथे बेकायदेशीर मशीदीच्या आवारात ५ ते ९ वय वर्षे असणाऱ्या पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप मौलवीवर आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणी पीडितेने आपल्या घरी घङलेला प्रकार सांगितला. याचपार्श्वभूमीवर पीडितेच्या आईने नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.
 
यामुळे दोन्हीही समाजाच्या गटांमध्ये हाणामारी झाली. याप्रकरणातील आरोपी मौलवी शब्बीर रजा हुसैन यांची वकिली करणारा आणि मौलवीवर कारवाई करणाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. दोन्ही पक्षांनी एकमेंकांवर हल्ले आणि गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामध्ये पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मोहम्मद युनूस, शाहिद अहमद आणि कबीर अहमद या तीन जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. 
 
दरम्यान, याप्रकरणात सांगितले गेले की, आरोपी मौलवी अल्पवीयन मुलींना जिनच्या गोष्टी सांगायचा आणि त्यांना घाबरवण्याचे काम करत होता. त्याच्या फोनमध्ये अल्पवयीन मुलींचे अश्लील फोटो आहे. मंगळवारी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी मौलवीचे समर्थन करणारा मोहम्मद खुर्शीद आणि मौलवीविरूद्ध तक्रार करणारे नबी हसन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. त्यावेळी याप्रकरणाला हिंसक वळण निर्माण झाले.
 
काही वेळानंतर एसपी मनोज कात्याल, सीओ निहारिका तोमर आणि इतर अनेक पोलिस अधिकारी रूग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी जखमींची भेट घेतली होती. याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाधिल मालसी गावात पीएस पथके तैनात करण्यात आली होती.
 
Powered By Sangraha 9.0