लखनऊ : हिंदू धर्म (Hindu Religion) अच्छा नही है म्हणत जिहाद्याने हिंदू मुलीला धर्मांतरण करण्यास भाग पाडले असल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कौशंबी येथील मंझनपुर पोलीस ठाणे परिसरात घडली आहे. गेल्या पाच वर्षांपासून अल्पवयीन हिंदू मुलीसोबत कट्टरपंथी युवकाने प्रेमसंबंध ठेवत तिला आपल्या बाजूने करून घेतले. याप्रकरणात पाच जणांचा समावेश असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्रसारमाध्यमानुसार, पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी जी इयत्ता १० वीच्या वर्गात शिकत आहे. त्याने पीडितेशी गेल्या पाच वर्षांपासून गोड गुलाबीने बोलत मैत्री केली. त्यानंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्य़ात ओढून तिच्यावर हिंदू धर्मांबाबत वाईट गोष्टी सांगत इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितला.
याप्रकरणी आता पीडितेने घडलेली घटना पोलिसांना सांगितली असता सर्व घडलेला प्रकार समोर आला आहे. पीडिता म्हणाली आहे की, इजहार मला गेल्या पाच वर्षांपासून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. त्याने मला बुरखा आणि कुराण दिले. माझ्यासोबत निकाह करण्यास त्याने अनेकदा सांगितले होते. हिंदू धर्म चांगला नाही असे तो म्हणाला होता, अशी महिती पी़डितेने दिली होती.
दरम्यान, इजहारसोबत पीडितेला तिच्या वडिलांनी अनेकदा पाहिले होते. मात्र तो तिला धर्मांतरण करण्यास सांगेल असे तिच्या वडिलांना वाटले नाही. यामुळे पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. ते म्हणाले की, घरातील कपाट उघडले असता मला बुरखा आणि कुराण दिसले असल्याचे पी़डितेच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. यावेळी पीडितेच्या वडिलांनी इजहारला पीडितेपासून लांब हो असे सांगितले असता, त्याने पीडितेच्या वडिलांना तुमची मुलगी मुस्लीम आहे. तिचा माझ्याशीच निकाह होईल अशी धमकीच दिली. याप्रकरणात आणखी काहींचा हात असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत.