पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने जिंकले सुवर्णपदक; जाणून घ्या कोण आहे नितेश कुमार!

    02-Sep-2024
Total Views |
nitesh-kumar-badminton-player-who-won-gold


मुंबई :   
  भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. नितेश कुमार याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव करून भारताला दुसरे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. दरम्यान, नितेश कुमारच्या देदीप्यमान सुवर्ण कामगिरीमुळे त्याचे देशाच्या कानाकोपऱ्यातून कौतुक केले जात असून पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा बॅडमिंटनपटू नितेश कुमार कोण आहे, याबाबत जाणून घेऊयात.

२९ वर्षीय नितेशचा २००९ च्या अपघातानंतर आलेल्या पायाच्या कायमस्वरूपी दुखापतीवर मात केली. त्याने अंतिम फेरीत बेथेलवर (निकाल) विजय मिळवून आपले वर्चस्व सबंध जगाला दाखवून दिले आहे. तथापि, नितेश कुमारचे पहिले प्रेम फुटबॉल होते. परंतु, २००९ साली विशाखापट्टणम येथे धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने एक पाय गमवावा लागला. त्यानंतर अपार मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर पदवी शिक्षण पूर्ण करत नितेशने खेळात आपले नशीब आजमावले.

हरियाणातील चरखी दादरी येथील पॅरा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा बॅडमिंटन या क्रीडाप्रकारात पुरुष एकेरी SL3 प्रकारातील अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे SL3 वर्गातील खेळाडू अधिक गंभीर शरीराच्या खालील भागातील अवयवांच्या अपंगत्वांसह या स्पर्धेत खेळताना दिसून येतात. तसेच, या वर्गातील खेळाडूंना अर्ध्या-रुंदीच्या कोर्टवर खेळण्याची आवश्यकता असते.


नितेश कुमारचा आजपर्यंतचा प्रवास
 
आशियाई पॅरा गेम्स (२०२२) – एमडी मध्ये सुवर्णपदक
आशियाई पॅरा गेम्स (२०२२) – एमएस मध्ये रौप्य पदक
आशियाई पॅरा गेम्स (२०२२) – एक्सडी मध्ये कांस्य पदक
आशियाई पॅरा गेम्स (२०१८) – एमडी मध्ये कांस्य पदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२४) – एमएस मध्ये कांस्य पदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०२२) – एमएस मध्ये रौप्य पदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप (२०१९) – एमडी मध्ये रौप्य पदक