विद्यार्थ्यांच्या कपाळावरील गंध पुसल्याने शाळेतून शिक्षिकेचे निलंबन

पालकांकडून घटनेचा निषेध

    02-Sep-2024
Total Views |

Hindu  
 
लखनऊ : विद्यार्थ्यांच्या कपाळावरील लावलेला गंध शिक्षिकेने पुसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे मुख्यध्यापक आणि इतर चार शिक्षकांना शाळेतून निलंबित करण्यात आले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील आहे. शिक्षिका उषा आणि आयशा यांनी विद्यार्थ्याच्या कपाळवरील गंध पुसल्याने त्यांना शाळेतून निलंबित करण्यात आले. तसेच आयशा यांनी शाळेत येणाऱ्या हिंदू मुलांना गंध लावून आल्यास गंध पुसला जाईल असे सांगितले. तसेच प्रार्थनेच्या वेळी अनेकदा नमाज अदा करण्यास विद्यार्थ्यांना परावृत्त केल्याचे सांगण्यात आले. मुस्लिम विद्यार्थ्यांना डोक्यात नमाजी टोपी घालून येण्याचे आयशा यांनी सांगितले होते.
 
२४ ऑगस्ट रोजी जिल्हा दंडाधिकारी अंकीत कुमार अग्रवाल यांनी शिक्षिकेच्या सोशल मीडियावर प्रासारित झालेल्या व्हिडिओसंदर्भात चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली होती. ही घटना किरतपूर येथील भानोरा गावात घडली आहे. याचप्रकरणात आता हिंदू विद्यार्थ्यांनी सांगितले होते की. मुस्लिम मुलांना नमाजी टोपी घालण्यास परवानगी आहे. मात्र कपाळाला गंध असल्यास खपवले जाणार नाही असे विद्यार्थ्यांनी सांगितले होते.
 
 
 
कपाळावर टीळा लावण्यासाठी आयशा यांनी विरोध दर्शवला होता. याचप्रकरणात उषा यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील टोपी काढल्याचा आरोप असल्याने उषा यांना शाळेतून निलंबित करण्यात आले होते.
 
याप्रकरणी आता आयशा यांनी माझ्याविरोधात हा एक कट असल्याचा दावा त्य़ांनी केला. तसेच मी कोणत्याच विद्यार्थ्याच्या कपाळावरील गंध पुसला नाही. मी गेल्या १८ वर्षांपासून शाळेत काम करत असल्याचे आयशा म्हणाल्या आहेत.
 
दरम्यान काही विद्यार्थ्यांनी आपल्या कपाळावर लावलेला गंध शाळेतील शिक्षिकेने पुसण्यास भाग पाडल्याची तक्रार आपल्या पालकांना केली होती. यावेळी पालकांनी २६ ऑगस्ट रोजी संबंधित शाळेत जाऊन घडलेल्या घटनेतचा निषेध केला.