उत्तर प्रदेशात केरला स्टोरी रिटर्न्स, पीडितेवर लैंगिक अत्याचार करत धर्मांतरणाची केली जबरदस्ती

    02-Sep-2024
Total Views |
 
Kerala Story
 
लखनऊ : कट्टरपंथींनी हिंदू मुलीला घरातून उचलून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला इस्लाम धर्मांतरण करण्यास भाग पाडल्याची घटना उत्तर प्रदेशातील बागपात येथे घडली आहे. रिझवान, रेशू आणि वसीम या तिघांनी बालात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी पीडितेला धर्मांतरण करण्यास जबरदस्ती केल्याने उत्तर प्रदेशात पुन्हा केरळा स्टोरीची पुनरावृत्ती या घटनेद्वारे अधोरेखित झाली आहे.  याप्रकरणी पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. तर रिझवानला १ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. 
 
ही घटना कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील आहे. याप्रकरणाची माहिती पीडितेच्या वडिलांना समजताच त्यांनी त्वरीत आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रार नोंदवताना सांगितले की, पीडित तरूणी सायंकाळी ७ वाजता घरातून बेपत्ता झाली. त्यानंतर तिचा शोधा घेण्यात आला. त्यावेळी पीडित मुलगी रिझवानच्या घरी होती. त्यावेळी पी़डितेच्या वडिलांनी रिझवानला सुनावले आणि पीडितेला आपल्या घरी घेऊन गेले.
 
 
 
याघटनेनंतर रिझवानचे भाऊ रेशू आणि वसीम काट्ठ्या घेऊन पीडितेच्या घरी गेले. त्यावेळी आरोपींनी पीडितेला घरातून उचलून घेऊन जावू अशी धमकीच दिली अशी तक्रार पीडितेच्या वडिलांनी केली होती. तसेच पीडितेच्या आईने आपल्या मुलीला घरात अनेकदा नमाज पडताना पाहिले होते.
 
तसेच रिझवानने पीडितेला अनेकदा धर्मांतरणाबाबत धमकावले होते. त्यांनी पीडितेसोबत लव्ह जिहादचा कट रचल्याचा दावा पीडितेच्या वडिलांनी केला आहे. तसेच त्याच कट्टरपंथींनी पीडितेचे अनेकदा शारिरीक शोषण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी तक्रारीत केला.
 
एफआयआरमध्ये रिजवान, रोशू आणि त्याचा भाऊ वसीम यांची नावे नोंदवली आहेत. सर्वांवर पोक्सो कायदा आणि भारतीय न्यायसंहिता कलम १३७(२), ३३३, ३५२, ११५ (२), ६४ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.