मोफत तांदूळ बंद ! आता रेशनकार्डवर मिळणार ‘या’ ९ नव्या वस्तू .

02 Sep 2024 18:09:21
 

Ration
 
 (Wikipedia : File Image)
 
मुंबई (Ration Card update) : केंद्र सरकारद्वारे देशातील गरजू आणि गरीब नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात असतात. यामधील शिधापत्रिका (Ration Card) धारकांना मोफत शिधा योजनेअंतर्गत शिधा दिला जातो. मात्र यापुढे यात एक महत्तवाचा बदल करण्यात आला असून, त्यानुसार शिधावाटप केंद्रांवर मोफत मिळणारा तांदूळ बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी आता ९ इतर जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या वस्तूंमध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश असणार आहे.
 
केंद्र सरकारच्या मोफत शिधा योजनेअंतर्गत देशातील सुमारे ९० कोटी नागरिकांना मोफत शिधा पुरवला जातो. परंतु या नव्या योजनेनुसार मोफत दिला जाणारा तांदूळ बंद करुन त्याबदल्यात गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या वस्तूंचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्नधान्यांतील वाढत्या भेसळीमुळे लोकांच्या आरोग्यावर होणारे वाईट परिणाम ही गंभीर बाब असून याच पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषण पातळी वाढवण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्तवाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना पोषक आहार असून लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारची आशा आहे.
  
 
 
Powered By Sangraha 9.0