नेपाळमध्ये दोन हजार हिंदूंची घरवापसी!

    02-Sep-2024
Total Views | 129

Nepal Ghar Vapsi

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nepal Hindu Ghar Vapsi)
विश्व हिंदू परिषदेने नुकताच नेपाळमध्ये घर वापसी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी २ हजार जणांनी एकत्र येत सनातन धर्म स्वीकारला आहे. विहिंपकडून हिंदू रीतिरिवाजांनुसार घरवापसी करण्यात आली आहे. हिंदू धर्मात पुन्हा आल्यानंतर हे लोक खूप अतिशय आनंदी दिसत होते.

हे वाचलंत का? : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी!

विश्व हिंदू परिषद, नेपाळचे राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राज्याचे अध्यक्ष आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर घरवापसी कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वांनी आपल्या इच्छेनुसार सनातन धर्म पुन्हा स्वीकारला आहे. यापूर्वी, इंदूर येथील एमखजराना गणेश मंदिरात मुस्लिम समाजातील आठ व्यक्तींनी हिंदू धर्म स्वीकारला. या व्यक्तींचे सनातन धर्मात विधिवत पद्धतीने स्वागत करण्यात आले असल्याचे विश्व हिंदू परिषदेने सांगितले.


VHP Nepal

घरवापसी कार्यक्रमाविषयी भीम पराजुली यांनी म्हटल्याप्रमाणे, ज्या व्यक्तींनी प्रलोभनातून किंवा अज्ञानामुळे ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांचे पुन्हा सनातन धर्मात स्वागत करण्यात आले आहे. नेपाळमधील सुनसरी, मोरंग आणि इतर जिल्ह्यांतील हजारो लोक स्वेच्छेने परतले असल्याचे त्यांनी नमूद केले.

अग्रलेख
जरुर वाचा
२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

२६ वर्षांच्या छळाविरुद्ध शांततापूर्ण प्रतिकारातून मानवी विवेकाची साक्ष

चिनी कम्युनिस्ट पार्टी अर्थात ‘सीसीपी’ने तेथील फालुन गोंग साधना अभ्यासकांवर केलेल्या अमानुष छळाविरुद्ध या अभ्यासकांनी शांतपणे आवाहन सुरू केले. त्याला आज २६ वर्षे होत आहेत. दि. २० जुलै १९९९ रोजी ‘सीसीपी’चे नेते जिआंग झेमिन यांनी फालुन गोंग आणि त्याच्या लाखो अनुयायांचा छळ सुरू केला आणि संपूर्ण देशात दहशतीची लाट पसरली. कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राजकीय दडपशाहीच्या दीर्घ इतिहासात विकसित केलेल्या प्रत्येक छळ तंत्राचा वापर करूनही या अभूतपूर्व हल्ल्याचा सामना करत, फालुन गोंग साधकांनी पाठ फिरवली नाही. त्याऐवजी, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121