मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nepal Hindu Ghar Vapsi) विश्व हिंदू परिषदेने नुकताच नेपाळमध्ये घर वापसी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी २ हजार जणांनी एकत्र येत सनातन धर्म स्वीकारला आहे. विहिंपकडून हिंदू रीतिरिवाजांनुसार घरवापसी करण्यात आली आहे. हिंदू धर्मात पुन्हा आल्यानंतर हे लोक खूप अतिशय आनंदी दिसत होते.
हे वाचलंत का? : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची ठिणगी!
विश्व हिंदू परिषद, नेपाळचे राष्ट्रीय संघटन मंत्री आणि राज्याचे अध्यक्ष आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर घरवापसी कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वांनी आपल्या इच्छेनुसार सनातन धर्म पुन्हा स्वीकारला आहे. यापूर्वी, इंदूर येथील एमखजराना गणेश मंदिरात मुस्लिम समाजातील आठ व्यक्तींनी हिंदू धर्म स्वीकारला. या व्यक्तींचे सनातन धर्मात विधिवत पद्धतीने स्वागत करण्यात आले असल्याचे विश्व हिंदू परिषदेने सांगितले.
घरवापसी कार्यक्रमाविषयी भीम पराजुली यांनी म्हटल्याप्रमाणे, ज्या व्यक्तींनी प्रलोभनातून किंवा अज्ञानामुळे ख्रिस्ती धर्म स्वीकारला, त्यांचे पुन्हा सनातन धर्मात स्वागत करण्यात आले आहे. नेपाळमधील सुनसरी, मोरंग आणि इतर जिल्ह्यांतील हजारो लोक स्वेच्छेने परतले असल्याचे त्यांनी नमूद केले.