लखनऊ : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात हिंदू महिलांसमोर अश्लील कृत्य केल्याचा दावा काही हिंदू महिलांनी केला आहे. हिंदूंच्या घराभोवती काही कट्टरपंथी येतात आणि लघुशंका करतात असा आरोप हिंदू महिलांनी केला आहे. याप्रकरणात महिलांच्या सुरक्षेची दखल घेत पोलिसांनी १ सप्टेंबर २०२४ रोजी तपास सुरू केला आहे.
हे प्रकरण बागपत जिल्ह्यातील खेकरा पोलीस ठाणे परिसरातील आहे. याप्रकरणी रविवारी लक्ष्मीनगर परिसरातील प्रभाग ४ येथे राहणाऱ्या हिंदू महिलांनी एकत्रितपणे खेकरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्या परिसरात चाँद, अनीस, सोहेल, साहिल, जावेद आणि साद हे कट्टरपंथी येतात आणि अश्लील चाळे करतात. तसेच अंमली पदार्थांचे सेवन करत शिवीगाळ करतात. याचा महिलांना त्रास सहन करावा लागतो.
अनेकदा पीडितांना उद्देशून अशोभनिय वर्तन आणि वक्तव्य केले जाते. ३१ ऑगस्ट रोजी शनिवारी पीडित महिलेने कट्टरपंथींचा वाढता प्रकार पाहता पीडितेने याप्रकारणी निषेध केला. त्यानंतर काही आरोपी महिलेच्या घरी गेले आणि त्यांच्यावर अत्याचार करू लागले होते. यावेळी पीडितेच्या कुटुंबियांना अश्लील बोलून मारहाण केली. त्यावेळी आरोपी म्हणाला की तुम्ही इथून निघून जा नाहीतर तुमचे या भागात राहणे जड जाईल. इथे आमची संख्या जास्त आहे. तुम्ही इथे काय करू शकता? असा प्रतिसवाल कट्टरपंथी आरोपीने केला आहे.
यावेळी हिंदू महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन रात्री ९.४५ मिनिटांनी पोलिसांना बोलवले आणि घडलेला प्रकार सांगितला आहे. त्यानंतर पोलिसांनी सकाळी येऊन घडलेल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यावेळी त्यांनी तक्रारीत घडलेला सर्व प्रकार नमूद केला होता. आरोपींनी महिलांना आमच्याकडे हत्यारे, बंदुक आहेत. त्याचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबतची माहिती आम्हाला माहिती आहे, असा आरोप पीडित महिलांनी तक्रारीत नमूद केला आहे. याप्रकरणात पोलीस ठाणे प्रभारी खेकरा यांना या प्रकरणाचा तपास आणि इतर आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.