पुणे : राज्यभरात सध्या पावसाळी वातावरण असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही या खराब हवामानाचा फटका बसला आहे. भीमाशंकर येथे जात असताना खराब हवामानामुळे मुख्यमंत्री शिंदेच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आज शेवटचा श्रावण सोमवार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या कुटुंबियांसह भीमाशंकर येथे दर्शनासाठी जात होते. परंतू, खराब हवामानामुळे बराच वेळ त्यांचे हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घेत होते. त्यामुळे त्यांचे हेलिकॉप्टर लांडेवाडीमध्ये उतरवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
हे वाचलंत का? - महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात दंगली का होत नाहीत? चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त विधान
संपूर्ण राज्यात सध्या पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान, या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.