मराठवाड्यात अतिवृष्टी! उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आढावा

    02-Sep-2024
Total Views |
 
Fadanvis
 
मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. तसेच नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
 
हे वाचलंत का? -  "उद्धव ठाकरे कधीच...;" खासदार नारायण राणेंची टीका
 
रविवारी रात्री हिंगोली, जालना आणि परभणीत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे उद्यापर्यंत शेतीच्या नुकसानीचा नेमका अंदाज येईल. नांदेड जिल्ह्यात एसडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले आहे. जायकवाडी धरण हे ८८ टक्के भरले आहे. या अतिवृष्टीत ४ लोकांना प्राण गमवावे लागले असून १७ जण जखमी झाले आहेत. तसेच या अतिवृष्टीत ८८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय १६० कच्च्या घरांची पडझड झाली आहे. शेतीसह इतरही नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन प्रशासनाने त्वरित मदत करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.