३२ किलोहून अधिक गोमांसाची तस्करी करणारे कट्टरपंथी पोलिसांच्या जाळ्यात

    02-Sep-2024
Total Views |

Beef Meat Smuggling
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील दोन कट्टरपंथींना गोहत्या (Beef Meat Smuggling) केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दिलशाद बेग आणि अरबाज अशी गोहत्या केलेल्या कट्टरपंथी आरोपींची नावे असून आरोपींनी ३२ किलोहून अधिक गोमांस जप्त केले अशी प्राथमिक माहिती आहे. दिलशाद आणि बेग अशी आरोपींची नावे असून शनिवारी ३१ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या घटनेत सहभागी असलेला सलमान आणि मोहम्मद शाह याचा मुलगा गुडनू फरार आहे. छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही आरोपींनी गोळीबार केला होता. फरार आरोपीच्या शोध सुरू आहे.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना उत्तर प्रदेशातील आंबेडकर जिल्ह्यातील इब्राहिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. येथे ३१ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक हरिनारायण यांनी फिर्याद दिली आहे. फर्यादित नमूद करत असताना लिहिले की, शनिवारी त्याच्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत असताना दुचाकीवर ४ जण गायीचे मांस घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याप्रकरणाची माहिती मिळताच हरिनारायण यांच्या पथकासह तात्काळ सूत्राने दिलेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले होते.
 
 
 
इतक्यातच समोरून २ दुचाकीवर ४ संशयित घटनास्थळी येताना दिसले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबण्यास सांगितले असता दुचाकीस्वारांनी पोलिसांवर गोळीबार केला. यामध्ये पोलिसांनी आरोपींना सरेंडर होण्यास सांगितले होते परंतु त्यांनी गोळीबार करणे सुरूच ठेवला होता. या सर्वांनी घटनास्थळाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता घटनास्थळावरील रितेश नावाच्या पोलिसाने बंदुक पळवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्यावेळी काहींनी गोळीबार सुरू असताना स्वत:चा बचाव करत सावध पावित्रा घेत हल्लेखोरांना पकडण्याचे काम त्यांनी केले होते.
 
 
 
या अटकेदरम्यान अन्य दोन आरोपी फरार झाले असून दिलशाद आणि अरबाज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या तपासात पोलिसांनी ३२ किलो २०० ग्रॅम गोमांस, एका बंदूक, काडतुसे आणि लोखंड वस्तू, दुचाकी, मोबाईल जप्त केला. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी चकमकीदरम्यान पळून गेलेले इतर दोन हल्लेखोर सलमान आणि मोहम्मद शाहचा मुलगा गुडनू असल्याचे सांगितले. दिलशाद आणि आरबाजने पैसे कमवण्यासाठी गायीची तस्करी करत असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणात आरोपींना भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.