अखिलेश यादवच्या निकटवर्तीयाचे आणि पीडितीचे डीएनए जुळले, सपा नेते नवाब सिंहांच्या अडचणीत वाढ

    02-Sep-2024
Total Views |
 
Nawab Singh Rape Case
 
 
लखनऊ : अखिलेश यादवचे निकटवर्तीय आणि समाजवादी पक्षाचे नेते नवाब सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणात फॉरेन्सीन कक्षाने ज्या पीडितेवर अन्याय झाला तिची वैद्यकीय तपासणी केली असता नवाब सिंहाचे रक्त आणि पीडितेचे रक्त एकत्र  जुळले असल्याची माहिती दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.
 
कनौजचे पोलीस अधिक्षक अमित कुमार यांनी याप्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमाला सांगितली आहे. ते म्हणाले, याप्रकरणात पोलिसांनी आणि फॉरेन्सिक लॅबने घटनास्थळी जावून माहिती घेतली. तपास सुरू करत पुरावा मिळवण्याचे काम केले आहे. त्या पुराव्यातून आरोपी सपा नेता नवाब आणि पीडित मुलीचे रक्त एकच असल्याचे तपासणीतून माहिती समोर आली आहे. यामुळे नवाब यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
 
 
 
याप्रकरणामुळे सपा नेते नवाब सिंहच्या डोकेदुखीत वाढ होऊ लागली आहे. सपा नेत्याने घडलेल्या प्रकरणात आरोपी आणि पीडितेचे डीएनए गुण जुळाल्याचा दावा प्रसारमाध्यांनी केला आहे. घटना ११ ऑगस्ट २०२४ रोजी घडली होती. पीडितेला कॉलेजमध्ये बोलवून तिला रात्रभर थांबवले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडितेने पोलिसांना फोन करत नवाब सिंहाविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी नवाब यादवला ताब्यात घेतले होते.