फतेहपुर : उत्तर प्रदेशातील फतेहपुर येथील बाराबांकी येथे १५ वर्षाच्या अल्पवयीन हिंदू युवतीचे लैंगिक शोषण केले आहे. कट्टरपंथी तरूण अफताबने पीडितेला आपला जोडीदार सगीरच्या घरी घेऊन गेला आणि तिच्यावर अन्याय करत तिचे लैंगिक शोषण केले आहे. हे प्रकरण १६ सप्टेंबर रोजी घडले असून याप्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहे.
पीडिता कोचिंग क्लासला जात असताना काजीपुर येथील दोन कट्टरपंथी नराधमांनी पीडितेशी संपर्क साधला. तिच्याशी बोलताना तिला भुरळ पाडली. त्यावेळी तिला अफताबचा मित्र सगीरच्या घरी घेऊन गेले. यावेळी अफताबने दाराला कुलूप लावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली.
या घटनेप्रसंगी पीडित युवती किंचाळली. घटनास्थळी असलेली आजूबाजूची लोकं दाखल झाली होती. यावेळी घटनास्थळावरून कट्टरपंथी आरोपी आफताबने पळ काढला. लोकांनी खोलीचे कुलूप तोडले. पीडितेने घडलेला सर्व प्रकार नागरिकांना सांगितला असता नागरिक थक्क झाले.
यावेळी सगीर घटनास्थळी उपस्थित असल्याने पोलिसांनी घडलेली माहिती जाणून घेतली होती. याप्रकरणात कडक तपासही करण्यात आला असून घटनेची माहिती पोलिसांनी जाणून घेतली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.