'विकसित भारत' अजेंड्यात बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची ; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण

19 Sep 2024 19:29:10
union minister nirmala sitharaman


नवी दिल्ली :   
 भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी बँकिंग क्षेत्राला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितले. २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा अजेंडा पुढे नेण्यासाठी बँकिंग क्षेत्राला महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, असे सांगताना पंतप्रधानांनी ठरविलेल्या अजेंडा पुढे नेण्यासाठी बँकांनी ठोस भूमिका घ्यावी, आम्ही तुमच्या भूमिकेला पाठिंबा देत गती देऊ, असेही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्राच्या ९० व्या स्थापना दिनानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सीतारामण म्हणाल्या, पायाभूत सुविधा क्षेत्राला मजबूत चालना देण्यासाठी, एमएसएमई क्षेत्राला गरजेवर आधारित वित्तपुरवठा, बँकिंग नसलेल्या लोकसंख्येला बँकिंग कक्षेत आणण्यासाठी आणि विमा प्रवेश वाढवण्यासाठी बँकांना मदत करावी लागेल, असेही केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्या पुढे म्हणाल्या, बँकिंग तंत्रज्ञान लँडस्केप झपाट्याने बदलत आहे. कारण ते सर्व ग्राहकांना सुरक्षित आणि नेव्हिगेट करण्यास सुलभ डिजिटल बँकिंग अनुभव प्रदान करते. मात्र, यासोबतच त्यांनी बँकांच्या तंत्रज्ञान सुरक्षेवर भर देण्यास सांगताना भारताला विकसित करण्यासाठी बँकांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल, यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भर दिला.



Powered By Sangraha 9.0