मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी रोजगार मेळावे

ना. मंगलप्रभात लोढा यांच्या सूचनांची अंमलबजावणी

    18-Sep-2024
Total Views |

iti
 
 
ठाणे दि.१८ : प्रतिनिधी : (Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana 2024) महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील आठ शासकिय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) केंद्रामध्ये दि.२३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत मेळाव्यातून रोजगार उपलब्ध केले जाणार आहेत.
 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या उपक्रमांर्तगत https://www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहेत. रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची क्षमतावाढ होईल. तसेच, उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील, असे या योजनेचे स्वरुप आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथे दि.२० सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्याच्या सूचना, कौशल्य विकास, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या आहेत.तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे सहायक आयुक्त श्रीमती संध्या साळुंखे यांनी केले आहे.
 
ठाणे जिल्ह्यातील आयटीआयमध्ये रोजगार मेळावे
 
१. सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) केंद्र, ठाणे.
 
२. मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कल्याण.
 
३. बुधवार दि.२५ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, उल्हासनगर.
 
४. गुरुवार दि.२६ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, अंबरनाथ.
 
५. शुक्रवार दि.२७ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, भिवंडी.
 
६. शुक्रवार दि. २७ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, मुरबाड.
 
७. शनिवार दि. २८ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, नवी मुंबई.
 
८. सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शहापूर.