मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची मुलगी आणि जावयाचा गंभीर अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात त्यांचे जावई समीर खान हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तर त्यांच्या मुलीलासुद्धा दुखापत झाली आहे.
हे वाचलंत का? - "केलेल्या कामाची वेळोवेळी आठवण करून द्यावी लागते, अन्यथा..."; अजितदादांचं वक्तव्य
नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान हे कुर्ला येथील रुग्णालयात आपल्या नियमित तपासणीसाठी गेले होते. तिथून परतत असताना अचानक त्यांच्या कार चालकाचा पाय ब्रेकऐवजी अॅक्सीलेटरवर पडल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात समीर खान यांच्या डौक्याला गंभी दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर नवाब मलिक यांच्या मुलीच्या हाताला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.