मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यादरम्यान, जय मालोकार नावाच्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूबाबत आता एक महत्वपूर्ण अपडेट पुढे आली आहे. जय मालोकरचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला नसून जबर मारहाणीमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दि. ३० जुलै रोजी अकोला येथील शासकीय विश्रामगृहाबाहेर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला होता. या राड्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तोडफोड राड्यानंतर मनसे पदाधिकारी जय मालोकार यांच्या छातीत दुखत असल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं.
हे वाचलंत का? - नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात! आयसीयूमध्ये उपचार सुरु
या राड्यानंतर १३ मनसैनिकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले होते. परंतू, आता जय मालोकार यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट पुढे आले आहेत. यात जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर मारहाणीमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.