वापरातून हद्दपार झालेले पेजर्स हिजबुल्लाह अद्यापही का वापरतात?

18 Sep 2024 17:25:15

 हिजबुल्लाह 
 
बेरूत : लेबनानची राजधानी बेरूत येथे १७ सप्टेंबर रोजी मंगळवारी एकामागे एक, विविध ठिकाणी हजारो ब्लास्ट झाले. या हजारो ब्लास्टमुळे ३ हजारांहून अधिक लोकं जखमी झाली आहेत. दहशतवाद्यांनी पेजर्सचा वापर केला होता. या पेजर्सच्या माध्यमातून एखादी माहिती किंवा संदेश सहजरित्या प्रसारित होणे शक्य नसते. अनेकदा मोबाईल हॅक होण्याच्या घटना घडतात. या भीतीचा हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेला सामना करावा लागल्याच्या भीतीने हिजबुल्लाह दहशतवादी संघटनेने पेजर्सचा वापर केला. पेजर्सबद्दल सांगायचे झाल्यास पेजर्स हे एक असे उपकरण आहे की ज्याचा वापर करणे सोपे आहे. त्याला हॅक करणे अवघड असते.
 
 
याप्रकरणात ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून पेजर्स हॅक झाल्य़ाने त्यांचा स्फोट झाला की अपघात होता? असा प्रश्न निर्माण होत आहे. आता हिजबुल्लाह दहशतवादी संघटना मोबाईल व्यतिरिक्त पेजर्सच्या माध्यमाचा सर्वाधिक वापर का करतात याबाबतचे कारण सांगितले गेले.
 
दरम्यान याप्रकरणी हिजबुल्लाह दहशतवाद्यांचा इस्रायलवर रोख आहे. हे प्रकरण इस्रायलने घडवून आणल्याचे हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे. मात्र अद्यापही याप्रकरणी ठोस माहिती सांगितली गेली नाही. यावर अद्यापही इस्त्रायलने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0