इजिप्त आंतरराष्ट्रीय महोत्सवात महाराष्ट्रातील 'अत्तर' लघुपटाची निवड

18 Sep 2024 11:22:09
 
attar
 
 
 
मुंबई : इजिप्तमधील महत्वाचा मानला जाणारा ब्रिटिश यूनिव्हर्सिटी इंटरनेशनल स्टूडंट्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या 'अत्तर' या कलाकृतीची निवड झाली असून ही बाब देशासोबतच महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरली आहे. हा चित्रपट महोत्सव ए. आय. शोरूक, न्यू कैरो, गव्हर्नरेट, इजिप्त या ठिकाणी १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी संपन्न होणार आहे. गटाराची साफ सफाई करणाऱ्या कामगारांचा प्रश्न हा जगभर आहेच. गटारात काम करणाऱ्या वडिलांना एक अत्तराची बाटली मुलीला द्यायची असून वडिलांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी त्या मुलीच्या संघर्षाची कहाणी 'अत्तर' मध्ये दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली आहे.
 
'अत्तर' या लघुपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी आपले मनोगत मांडताना म्हटले की, "ब्रिटिश यूनिव्हर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवलमध्ये अत्तरची निवड होणे याचा खूप आनंद आहे. आम्ही केलेल्या कलाकृतीची जगाच्या पाठीवर निवड होणे आणि त्यांना आवडणे आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे". 'अत्तर'मध्ये बालकलाकाराच्या प्रमुख भूमिकेत मीरा शेडगे आपल्याला पाहावयास मिळणार आहे.
 

attar  
 
द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि रुहानी म्युझिक निर्मित असलेल्या 'अत्तर'चे रामकुमार गोरखनाथ शेडगे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेली ही कलाकृती असून माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत 'अत्तर' खूप महत्वाची भूमिका बजावत असते. 'अत्तर' जणू माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सुगंधी 'अत्तराची अस्वस्थ करणारी गोष्ट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांनी मांडली असून जगभरातील ६० देशात 'अत्तर' लघुपटाचा दरवळ प्रेक्षकांपर्यंत पोहचला आहे.
Powered By Sangraha 9.0