नवी दिल्ली : हिंडेनबर्गने अदानी समूहाविरोधात आरोपांची राळ उडविली असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलाकडून कंपनीविरोधात खोटा बातम्या पसरविण्यात आल्या आहेत. वकील संजय हेगडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून अदानी समूहाविरोधात बनावट प्रेस रिलीज प्रसिध्द केली आहे.
दरम्यान, संजय हेगडे यांनी 'एक्स' हँडलवर कंपनी सरकारी भागधारकांची आणि व्यक्तींची नावे जाहीर करेल ज्यांना कंपनीच्या गुंतवणुकीतून फायदा झाला आहे, असा आशयाचा खोटा मजकूर प्रसारित केला. अदानी समूहाकडून या प्रेस रिलीजचे खंडन करण्यात आले असून फेक न्यूज असल्याचे समोर आले आहे.
संजय हेगडेंच्या खोट्या बातमीवर कंपनीकडून स्पष्टीकरण आले आहे. अदानी ग्रुपवर कोणतेही लेख किंवा बातम्या प्रकाशित किंवा प्रसारित करण्यापूर्वी आम्ही मीडिया आणि प्रभावकांना तथ्ये आणि स्त्रोतांची पडताळणी करण्यास प्रोत्साहित करतो, असे अदानी समूहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संजय हेगडे यांनी दि. १० सप्टेंबर रोजी एक बनावट पत्र प्रसारित केले आहे. या बनावट पत्रात असे सूचित केले होते की कंपनी सरकारी भागधारकांची आणि व्यक्तींची नावे जाहीर करेल ज्यांना कंपनीच्या गुंतवणुकीतून फायदा झाला आहे. अदानी कंपनीचे नाव बदनाम करण्यासाठी लिहिलेले "अदानी निराधार आरोप आणि धमक्यांचा निषेध करते" या थीमसह एक बनावट प्रेस रिलीज प्रसारित केले.