लखनऊ : गणेश मूर्तीसमोर (Ganesh Murti) काही कट्टरपंथींनी पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे. त्यावेळी धर्मांधांनी हातात हिरवे झेंडे घेऊन घोषणा दिल्या होत्या. ही घटना १६ डिसेंबर रोजी घडली असून याप्रकरणात पोलिसांनी लक्ष घालून पुढील तपास सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशातील बलरामपूर येेथे गणेश मूर्तीसमोर कट्टरपंथींनी "रसूल के गुलामो को मौत भी कबुल है", "पॅलेस्टिनी मुस्लिम जिंदाबाद", मस्जिद-ए अक्सा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. भारतात रहायचे असेल तर ख्वाजा- ख्वाजा म्हणावे लागेल अशा घोषणाबाजी करत वाद पेटवण्याचे काम कट्टरपंथींनी केले.
याच घटनेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पोलीस कट्टरपंथींच्या घोळक्यात दिसत आहेत. पोलिसांनी संशयित कट्टरपंथी युवकाला पकडले होते. मात्र कट्टरपंथींच्या घोळक्याने पोलिसांवर दबाव आणून संशयित युवकाला सोडण्यास सांगितले. त्यावेळी संशयित कट्टरपंथी पोलिसांच्या तावडीतून निसटला गेला.
अशातच आता याप्रकरणी सिद्धीविनायक सेवा समिती, उत्रौला यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. कट्टरपंथींनी देशद्रोही घोषणा केल्याचा आरोप हिंदूंनी केला आहे. पुन्हा याठिकाणी असा प्रकार होऊ नये अशी विनंती येथील व्यापाऱ्यांनी पोलिसांना केली आहे.