अमित ठाकरे विधानसभा लढवणार? बैठकीत काय ठरलं?

16 Sep 2024 17:48:34
 
Amit Thackeray
 
मुंबई : ठाकरे घराण्यातील आणखी एकजण निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी सोमवारी नेत्यांच्या बैठकीत आपली ईच्छा बोलून दाखवली.
 
विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनीही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास २०० ते २२५ जागांवर उमेदवार देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी निवडणूकीच्या रणनितीबाबत चर्चा करण्यासाठी मनसे नेत्यांची बैठक पार पडली.
 
हे वाचलंत का? -  निवडणूकीत मविआच्या रेडयांना चाबकाने फोडणार : सदाभाऊ खोत
 
या बैठकीत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची ईच्छा बोलून दाखवली असून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते कोणत्या मतदारसंघातून लढणार याबाबत त्यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.
 
 
 
Powered By Sangraha 9.0