राजस्थानात भीषण अपघातात सहा जण ठार; पोलिसांकडून ट्रकचालकाचा शोध सुरू

15 Sep 2024 12:24:39
rajasthan road accident

 
नवी दिल्ली :      राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात वाहनाच्या धडकेत यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यु झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने व्हॅनला धडक दिल्याने सहा यात्रेकरूचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. ही घटना रविवार, १५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
 

हे वाचलंत का? -    राज्य शासनाच्या आदेशानंतर बँका 'या' कालावधीत बंद, आरबीआयकडून सुट्ट्यांच्या तारखेत बदल


दरम्यान, हिंदोली पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र अधिकारी पवन मीना यांनी पीटीआयला सांगितले की, ट्रक चुकीच्या दिशेने येत होता आणि यात्रेकरूंच्या व्हॅनला धडकला. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील नऊ यात्रेकरू राजस्थानमधील सीकर येथील खातू श्याम मंदिरात दर्शनासाठी जात असताना पहाटे पाचच्या सुमारास बुंदी येथे हा अपघात झाला.
 
अपघातातील मृतांमध्ये मदन नायक, मांगीलाल नायक, महेश नायक, राजेश आणि पूनम यांचा समावेश असून त्यांचे वय १६ ते ४० वर्षे दरम्यान आहे. अद्याप एका मृतदेहाची ओळख पटली नसल्याचेही पोलिसांनी यावेळी सांगितले. स्थानिक पोलिसांकडून ट्रकचालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.


 
Powered By Sangraha 9.0