जामा मशीदीतील कट्टरपंथींकडून शोभायात्रेवर दगडफेक

15 Sep 2024 16:54:32

Muslim People Stone Pelting
 
जहाजपूर : राजस्थानातील जहाजपूर येथील रामवाडीच्या मशीदीतून काही कट्टरपंथींनी हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला केला आहे. जामा मशिदीच्या जहाजपूर येथील नगरपालिकेने नोटीस बजावून येत्या २४ तासांत मालकी, बांधकाम मंजुरी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. जामा मशीद ही बेकायदेशीर असून तिला पाडण्याचे मागणी करण्यात आली आहे. ही घटना १४ सप्टेंबर रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजस्थानातील जहाजपूर येथे घडली आहे. ज्यावेळी हिदूंची शोभायात्रा मशीदीच्या समोर आली. तेव्हा काही अल्पसंख्यांकांनी दगडफेक केली. यामध्ये काहीजण हिंदू जखमी झाले होते. यामुळे आता शाहापूरा येथील पोलिसांनी १० जणांना आपल्या ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, शहरातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरीही नियंत्रणात आहे, अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
 
 
याप्रकरणाची माहिती मिळताच शाहापूराचे एसपी राजेश कुमार कानवट आणि एएसपी चंचल मिश्रा आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. आंदोलकांनी बोलणे सुरू केले असून महापालिका प्रशासनाने घटनास्थळावरून अवैध अतिक्रमण हटवल्याने प्रकरण शांत झाले.
 
रात्री जिल्हाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत, एसपी राजेश कानवट यांच्यासह अजमेरचे आयजी पोलिस ओमप्रकाश यांनी तेथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या सूचना केल्या आहेत. या घडलेल्या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाने जिल्हा प्रशासन कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0