११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन

15 Sep 2024 20:45:48

Prabhu Shree Ram
 
अयोध्या : गेल्या सहा महिन्यांत ११ कोटी भक्तांनी अयोध्येत श्रीरामललाचे (Prabhu Shree Ram) दर्शन घेतले. यामुळे अयोध्येची पर्यटनक्षेत्र म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे. यावर उत्तर प्रदेशातील पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “श्री रामललाचे मंदिर प्रतिष्ठित झाल्यानंतर भाविकांचा आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे.
 
जानेवारी ते जून महिन्यादरम्यान १० कोटी ९९ लाख पर्यटक आणि भक्तांनी रामललाचे दर्शन घेतले आहे. याआधी उत्तर प्रदेशात ४.६१ कोटी पर्यटकांची लोकसंख्या होती. मात्र आता त्यात प्रचंड वाढ झाली आहे.” भव्य श्रीराम मंदिर होण्याआधी उत्तर प्रदेशातील धर्मस्थळांसाठी देश-विदेशांतील पर्यटकांच्या संख्येत म्हणावी अशी वाढ होत नव्हती. मात्र आता श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पर्यटकांमध्ये आणि भाविकांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
 
उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे ४.६१ भाविक आणि पर्यटक आले. तर दुसरीकडे मथुरेत ३.०७ कोटी भाविक आणि पर्यटकांनी आपली उपस्थिती दर्शवली आहे.तसेच उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ६७.३३ लाख देशी- विदेशी पर्यटकांचा आकडा आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे २०२२ या वर्षात ३१.८६ कोटी पर्यटकांची नोंद करण्यात आली आहे. तर यंदाच्या वर्षी ३५ लाख भाविक आणि पर्यटक आले असून २०२४ वर्षाच्या अखेरीस या आकड्यात वाढ होईल, असे चित्र दिसून येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0