नदीकिनारी मांस, मद्य विक्रीस बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

14 Sep 2024 18:21:13
narmada river located meat banned


नवी दिल्ली :     
 नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या भागात मांस आणि मद्य विक्री होणार नाही, असा आदेश मध्य प्रदेश सरकारने काढला आहे. नदीकिनारी असलेल्या शहरे आणि गावांमध्ये आणि धार्मिक महत्त्व असलेल्या ठिकाणी मांस, मद्यविक्री थांबवावे, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.




दरम्यान, अमरकंटकमधील नर्मदेच्या उगमापासून ते राज्यात जिथे जिथे नर्मदा नदी वाहते तिथे सांडपाणी नर्मदेत जाऊ दिले जाणार नाही, असे नर्मदेच्या स्वच्छतेसाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री यादव म्हणाले. या बैठकीत नर्मदेच्या उगमापासून काही अंतरावर अमरकंटकमध्ये सॅटेलाइट सिटी स्थापन करण्याची योजना आखण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचबरोबर, नदीतील मशिन वाळू उत्खनन बंद करण्याच्या सूचना या बैठकीत नर्मदेच्या उगमापासून काही अंतरावर अमरकंटकमध्ये सॅटेलाइट सिटी स्थापन करण्याची योजना आखण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नर्मदा नदीत मशिन वापरून वाळू उत्खनन बंद करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. १०७९ किमी लांबीचा १३१२ किमी लांबीचा नर्मदा मध्य प्रदेशातून जातो. २१ जिल्हे, ६८ तहसील आणि ११२६ घाट या सर्व ठिकाणी यानिर्णयामुळे परिणाम होणार आहे.



Powered By Sangraha 9.0