हरदोई : एका बहुजन समाजाच्या मुलीला एका मुफ्तीने उपचारातून लवकर बरे करेन असे सांगून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. पीडितेच्या आई-वडिलांनी आपली मुलगी अजारी असताना तिला डॉक्टरकडे न घेऊन जाता एका मुफ्तीकडे घेऊन गेले. त्यावेळी त्याने पीडितेसोबत गैरवर्तन केल्याचा दावा पीडितेने केला आहे. ज्यावेळी पीडित युवती मुफ्तीकडे जायची तेव्हा तो तिला तुझे इतर दुसरीकडे निकाह होऊ देणार नाही. तु माझ्याशी निकाह करायचा अशी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील हरदोई येथे घडले आहे.
२२ वर्षीय पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती आजारी होती म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला मुफ्ती इम्रानकडे घेऊन गेले होते. त्यानंतर तिची प्रकृती स्थिर झाली होती. तिला जेव्हा जेव्हा अस्वस्थ वाटायचे तेव्हा ती मुफ्ती इम्रानकडे जायची.
याप्रकरणात पीडितेने केलेल्या आरोपानुसार, इम्रानचा तिच्याबाबत वाईट हेतू होता. इम्रान तिला अनेकदा फोन करायचा आणि त्यानंतर तिच्यासोबत अनेकदा गैरकृत्य केल्याचा पी़डितेचा आरोप आहे. मुफ्ती इम्रान हा पीडितेला इतर दुसरीकडे कुठेही विवाह करू देणार नाही, अशी धमकीच द्यायचा. यामुळे आता पीडितेने मुफ्ती इम्रानची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
याप्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीची दखल घेत सांगितले की, बेनीगंझ येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणीने मुफ्तीविरोधात तक्रार दाखल केली. उपचार करण्याच्या बहाण्याने मुफ्तीने आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप तिने तक्रारीत दाखल केला होता. तिला निकाह करण्याची धमकी दिली असून इम्रानवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.