श्रीविजयपुरम (Shri Vijaypuram) : केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी पोर्ट ब्लेयर असे नाव होते. मात्र आता या राजधानीचे नामांतरण करत श्रीविजयपूरम् असे नाव देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. श्रीविजयपूरम् हे नाव ठेवण्यामागे त्यांनी कारण सांगितले आहे. ते म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अंदमान आणि निकोबारचे योगदान दर्शवते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यता आणि इतिहासात बेटाला महत्त्व आहे.
नौदलाची भूमिका बजावण्यासाठी हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर तुरूंगात वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या भारत मातेच्या समर्पणासाठी केलेले संघर्षाचे ठिकाण म्हणून अंदमान निकोबार बेटाची ओळख आहे.
या बेटाच्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थीती पाहता भारतीय उपखंडात जाण्यासाठी हे बेट महत्त्वाचा मार्ग आहे. आजही भारतीय लष्कर आणि नौदलासाठी एक महत्त्वाचे धोरणात्मक केंद्र आहे. .शिवाय, अलीकडे हे बेट पर्य़टनाच्या बाबतीत झपाट्याने विकासाच्या मार्गाने आगेकुच होताना दिसत असून ते देशासाठी योगदान ठरत आहे.
२०१८ या वर्षाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अंदमान निकोबारला भेट देऊन त्यांनी येथील तीन बेटांनी नावे बदलण्याची घोषणा केली होती. त्यांनी हॅवलॉक बेटाचे स्वराज बेट,नील बेट आणि रॉस बेटाचे नाव नेताजी सुबाषचंद्र बोस बेट असे ठेवले.