शिमलानंतर आता मंडीतील अवैध मशिदीवरून हिंदू आक्रमक!

13 Sep 2024 13:59:31

Mandi Hindu Andolan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mandi Hindu Andolan) 
शिमला येथील संजौली परिसरात असलेल्या बेकायदेशीर मशिदीच्या अवैध बांधकामाविरोधात हिंदूंनी तीव्र निदर्शने केली. यावेळी पोलिसांकडून हिंदू आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर आता मंडी येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामाबाबत शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर रोजी विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत निषेध रॅली काढली आहे. मात्र यावेळीसुद्धा हिंदू आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटरगनचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.

हे वाचलंत का? : नेपाळीची हिंदूराष्ट्र म्हणून असलेली ओळख नष्ट करण्याचे येचुरींचे षड्यंत्र
 
मंडी शहरातून साकोडी चौकाकडे मार्गस्थ होत असलेल्या निषेध रॅलीत मोठ्या संख्येत हिंदू बांधव सहभागी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडब्ल्यूडी आणि मशिदीच्या लोकांनी मंडीतील जेल रोडवर बांधलेल्या बेकायदेशीर मशिदीची भिंत पाडण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या उपस्थितीत ही भिंत पाडण्यात आली. पीडब्ल्यूडीच्या जमिनीवर मशिदीची भिंत बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या मशिदीचे प्रकरण सध्या मंडी महापालिका आयुक्तांच्या न्यायालयात सुरू आहे. मात्र निर्णय येण्यापूर्वीच मशिदीतील भिंत पाडण्यात आल्याने मशिदीत कुठेतरी बेकायदा बांधकाम झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Powered By Sangraha 9.0