मुंबई : मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी भेट दिली आहे. मुंबईतील केशवजी नाईक चाळीतील सार्वजनिक गणेशोत्सवात उपस्थित राहत श्री गणेशाची पूजा केली. १८९३ मध्ये मुंबईत गणेश चतुर्थीचा पहिला सार्वजनिक उत्सव आयोजित केशवजी नाईक चाळ येथे गणेशाचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. विविध धर्माच्या लोकांना एकत्र आणणारा हा उत्सव मुंबईच्या बहुसंख्यांकांचा आणि सौहार्दाचा पुरावा आहे, असे अमेरिकन दुतावासाने आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे.
दै. मुंबई तरुण भारत ( MTB ) तर्फे ‘ पर्यावरणपूरक घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचे’ आयोजन
अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा
दरम्यान, लॉस एंजेलिसचा महापौर आणि भारताचा राजदूत या नात्याने मी नेहमी माझ्या कार्यालयात आणि घरात गणेशाची मूर्ती ठेवली आहे, ज्यामुळे मला प्रेरणा मिळते. असे राजदूत एरिक गार्सेटी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेतील अनेक समुदायातील लोकांच्या हृदयात गणपतीचे विशेष स्थान आहे आणि अमेरिकन लोक अडथळे दूर करणारे आणि सुख-समृद्धी देणाऱ्या गणेशाची पूजा करतात, अशा भावना गार्सेटी यांनी व्यक्त केल्या आहेत.