मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळ्यात सीबीआयकडून अटक करण्यात आली. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आता निकाल देणार असून दि. १३ सप्टेंबर रोजी अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट निकाल देणार आहे. दरम्यान, न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी सुरू असून या खटल्याचा निकाल येणार आहे.
दरम्यान, मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने दि. २१मार्च रोजी केजरीवाल यांना ईडीने अटक केली. त्याआधी मुख्यमंत्री केजरीवाल यांना ९ वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. तरीदेखील केजरीवाल चौकशीसाठी तपास यंत्रणेसमोर हजर राहिले नाहीत त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दि. २२ मार्च रोजी त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर ११ दिवसांची कस्टडी रिमांड घेतली. चौकशी केल्यानंतर तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली.