आग्रा : कनिष्ठ डॉक्टरने बालरोग विभागात दाखल असलेल्या ११ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली. या घडलेल्या प्रकरणात कुटुंबियांनी बालरोग विभागाकडे तक्रार केली असून हा प्रकार आग्रा येथे घडला आहे. या घडलेल्या प्रकरणात वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मंगळवारी रात्री कनिष्ठ डॉक्टरला पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कनिष्ठ डॉक्टरला निलंबित केले. डॉक्टरचे नाव दिलशाद हुसैन असून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शहागंज भागातील एका ११ वर्षीय लहान मुलीला टायफाईड आजाराची लागण झाली होती. वैद्यकीय रूग्णालयातील बालरोग विभागात पीडितेला दाखल करण्यात आले होते. मंगळवारी रात्री प्रचंड अजारी होती त्यावेळी पीडित मुलगी आईसोबत गॅलरीत फिरत होती. त्यावेळी पीडितेला कनिष्ठ डॉक्टर दिलशाद हुसैन वॉर्ड शेजारी असलेल्या खोलीत घेऊन गेला. पीडितेचा रक्तदाब तपासण्यास सुरूवात केली. याचवेळी काही वेळानंतर पीडितेची आई कामानिमित्त वॉर्डात गेली आणि काही वेळाने मुलगी रडत कनिष्ठ डॉक्टरांच्या खोलीतून धावत बाहेर आली. यावेळी पीडितेने हंबरडा फोडत घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पीडितेने सांगितले की, रक्तदाब तपासण्याच्या नावाखाली डॉक्टरने अश्लील कृत्य केले असून पीडितेच्या गुप्तांगाला स्पर्श करत हैवानी कृत्य केले. डॉक्टरने माझ्याशी गैरवर्तन केल्याचे पीडितेने सांगितले. यावेळी पी़डितेच्या कुटुंबियांनी घडवलेल्या घटनास्थळी गोंधळ सुरू केला. तसेच याप्रकरणाची माहिती विभागातील वरिष्ठ डॉक्टरांना देण्यात आली होती. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मुलीच्या कुटुंबियांनी डॉक्टरविरोधात तक्रारीच्या आधारे एमएम गेट पोलीस ठाणे येथे पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
यावेळी या घटनेनंतर संबंधित डॉक्टर दिलशादला निलंबित करण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर प्रशांत गुप्ता यांनी सांगितली.