"तुरूंगातील ९० टक्के लोकं आमचीच आहेत तुला जीवे मारण्यास सांगू", अल्पसंख्यांक नेत्याची शिक्षकाला धमकी!

12 Sep 2024 15:32:25

Muhammad Izhar Asfi
 
पाटणा : बिहार येथील किशनगंज जिल्ह्यातील कोचाधामन येथे राष्ट्रीय जनता दलाचे कट्टरपंथी आमदार मुहम्मद इझार आसफींनी एका शिक्षकाला धमकी दिली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओत कट्टरपंथी आमदार मुहम्मदने शिक्षकाला धमकी दिली की तुरूंगात टाकू, तुला माहिती आहे का, तुरूंगातील ९० टक्के लोकं ही आमची आहेत. तुला तुरूंगातच त्रास द्यायला सांगू, अशी धमकी मुहम्मद इझार असीफने दिली.
 
राष्ट्रीय जनता दल कट्टरपंथी आमदार मुहम्मद इझार आसफीने एका शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली. लालू यादव आणि राबडी देवी यांचे सरकार असताना लोकांना धमकी देणे, अपहरण, खून, बलात्कारसारख्या अनेक घटना आणि गुन्हे आमदार मुहम्मदवर आहेत. यानंतर आता शिक्षकाला धमकी देण्यात आली असल्याची माहिती आढळली.
 
 
 
कट्टरपंथी आमदाराची शिक्षकाला धमकी
 
कट्टरपंथी आमदार शिक्षकाला म्हणाला की, "तुरूंगात असलेले ९० टक्के लोकं आमचे पुरूष आहेत. यातील चोर, लुटारू तुला बाहेर काही झाले नाहीतरी तुला तुरूंगात आम्ही तुला त्रास द्यायला सांगू", यावेळी आरजेडी आमदाराच्या समर्थकांनी घेरलेले दिसत आहेत. तेथे काही अल्पवयीन मुलेही आहेत. या सर्वांसमोर धमकीची भाषा वापरली जात आहे. 
 
याप्रकरणाचा व्हिडिओ बिहार येथील असलेल्या बांगलादेश सीमानजीकचा होता. याप्रकरणात सरकारी शिक्षकाने एका विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून मारहाण केली होती. याविरोधात या कट्टरपंथी आमदाराने शिक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण किशनगंज जिल्ह्यातील असून या जिल्ह्यात कट्टरपंथींची सर्वाधिक लोकसंख्या आहे. 
 
 
Powered By Sangraha 9.0