मुंबई : देशातील रिन्युएबल एनर्जी क्षेत्रातील कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या समभागांनी सलग दुसऱ्या सत्रात मोठी वाढ केली आहे. सलग दोन दिवसात सुलझॉन एनर्जी लिमिटेड शेअर्समध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये अधिक अपसाईड क्षमता दिसून येते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सुझलॉन एनर्जी शेअर्सने पाच टक्क्यांनी उसळी मारून ८१.९५ रुपयांच्या अप्पर सर्किट पातळी गाठली आहे. यासोबतच शेअर फक्त दोन व्यवहार दिवसांत १०.२४ टक्क्यांनी वधारला आहे. भांडवली बाजार व्यवहारात सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या समभागांनी सलग दुसऱ्या सत्रात वाढ केली आहे.
आगामी काळात सुझलॉन शेअरमध्ये तेजी दिसून येईल. उच्च-जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांनी केवळ या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. शेअर प्राईज ८१-८४ झोनच्या वरचे निर्णायक वाढ १०० रुपयांपर्यंतच्या वाढीच्या संभाव्यतेसाठी आवश्यक आहे, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे