व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत वाढ; जाणून घ्या आता दर किती

01 Sep 2024 12:52:07
lpg-cylinder-increased-price


नवी दिल्ली :       दिल्लीत १९ किलो सिलिंडरची किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आता १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ३९ रुपयांनी वाढली असून घरगुती सिलिंडरच्या किमतीत कुठलीही वाढ झालेली नाही. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत.

 
 

दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ३९ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ रविवारपासून लागू होणार असून या वाढीनंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत १,६९१.५० रुपये झाली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत सातत्याने बदल होत आहेत. १ जुलै रोजी कंपन्यांनी १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ३० रुपयांनी कमी करून दिल्लीत त्याची किंमत १,६४६ रुपये केली होती. याआधी १ जून रोजी ६९.५० रुपयांनी कमी करून किंमत १,६७६ रुपये इतकी होती.



Powered By Sangraha 9.0