रूग्णालयात दाखल केलेल्या कट्टरपंथी रूग्णाचे नर्सवर अत्याचार! प. बंगालमध्ये लैंगिक शोषण सुरूच

    01-Sep-2024
Total Views |

Sexual Assault Nurse 
 
कोलकाता : प. बंगालमध्ये आर जी कर प्रकरणाची देशात पुनरावृत्ती होत आहे. हावडा येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. अशीच घटना बीरभूम जिल्ह्यातील रूग्णालयात घडली असून रूग्णालयातील नर्सवर विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. कट्टरपंथी युवक अब्बासउद्दीन असे तरूणाचे नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा आरोप लावण्यात आला आहे. आजारपणामुळे दाखल झालेल्या अब्बासउद्दीनने नर्ससोबत गैरवर्तन केले. ही घटना शनिवारी ३१ ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याचा तपास सध्या सुरू आहे.
 
याप्रकरणात संबंधित रूग्णालयाने आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे. जर आऱोपीवर कारवाई न झाल्यास काम बंद करत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशार रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसेच प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बीरभूम जिल्ह्यातील इलामबाजारमध्ये घडली. शनिवारी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 
याप्रकरणात तक्रारीत म्हटले की, घटनेच्या रात्री अब्बासउद्दीन या कट्टरपंथीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याला स्ट्रेचरवर आणण्यात आले होते. त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही देखभाल करत होते. यावेळी अब्बासउद्दीन यांना उपचारासाठी इमर्जन्सी वॉर्डात दाखल करण्यात आले.
 
यावेळी अब्बासउद्दीनने वॉर्डातील नर्सचा विनयभंग करण्यास सुरूवात केली होती असा आरोप आहे. अब्बासुद्दीनच्या कृतीने नर्स घाबरून गेली आणि तिने यावेळी प्रतिरोध केला. यावेळी संतप्त झालेल्या अब्बासउद्दीनने पीडितेला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली होती. यावेळी नर्स संबंधित वॉर्डातून परतली असून तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती सहकाऱ्यांनी दिली होती.
 
यावेळी अब्बासउद्दीनच्या कृतीने रूग्णालयातील इतर कर्मचारी संतापले. याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर आरोपींवर कडक कारवाई न झाल्यास काम बंद करून आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला होता.
 
याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या पोलीस याप्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत. यासंबंधीत प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.