कोरोनाकाळात मशीदीचे तीन मजले बेकायदेशीर, हिमाचल प्रदेशात लँड जिहादच्या घटनेने हिंदू त्रस्त
01-Sep-2024
Total Views |
शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे लँड जिहादचे धक्कादायक प्रकरण आढळून आले आहे. कोरोनाकाळात बेकायदेशीर जागेत मशीदीवर तीन मजले बांधण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे संतप्त हिंदू जमावाने मोर्चा काढत निदर्शन केले. तसेच मशीदीच्या भोवताली अनेक कट्टरपंथींनी बेकायदेशीर दुकाने उघडली आहेत, यामुळे वातावरण बिघडवण्याचे काम कट्टरपंथी करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही घटना शिमला येथील संजौली येथे घडली आहे.
बेकायदेशीर जागेवर कट्टरपंथींनी मशीदीचे बांधकाम केले असे सांगण्यात आले आहे. कोरोनाकाळात मशीदीवरील बेकायदेशीर असलेले तीन मजले बांधण्यात आल्याने शिमला येथील संजौलीच्या हिंदूंनी बेकादेशीर बांधकामाला विरोध दर्शवला आहे. बेकादेशी मशीद बांधल्याने अनेक लोकं याठिकाणी येऊन वातावरण बिघडवणयाचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ लागले अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याप्रकरणात सर्व जमाव एकत्र जमला आणि त्यांनी घोषणाबाजी करत याप्रकरणी लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. त्यांनी मशीदीसमोर निदर्शने दाखवल्यानंतर भजनही केले. तसेच मशीदीच्या अवतीभोवती असलेली बेकायदेशीर दुकाने हटवण्याची मागणी त्यांनी केली. अशातच एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित मशीद ही एका वक्फ बोर्डाच्या जागेवर बांधण्यात आली आहे. मशीदीवरील तीन मजले हे बेकायदेशीर आहेत. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरू असल्याचे सांगितले आहे. याप्रकरणात कसून चौकशी सुरू असल्याचे सांगितले गेले.