नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा भारताची मान उंचावली आहे. मात्र, नीरजच्या एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. नीरज सुवर्णपदकाला गवसणी घालेल असे अनेक भारतीयांचे स्वप्न होते. मात्र, त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमने ८ ऑगस्ट रोजी सुवर्णपदक पटकावून पॅरीस ऑलिम्पिकमध्ये आशिया खंडाचे नाव उंचावले आहे. याचपार्श्वभूमीवर आता नीरज चोप्राच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली असून अनेकांची मने जिंकली आहेत.
नीरज चोप्राने ८९.४५ मीटर भाला फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. तर याउलट अर्शद नदीमने भालाफेकीच्या कामगिरीत सगळ्यांना थक्क केले आहे. पॅरीस येथील जॅवलिन थ्रो (भालाफेक) खेळात अंतिम क्षणी ९२. ९७ मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले.नीरज चोप्रा देशासाठी सुवर्णपदक मिळवून आणेल अशी भारतवासीयांना आशा होती. मात्र, नीरजचे स्वप्नांचा भंग झाला. यानंतर नीरजच्या आई-बाबांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नीरजच्या आई-बाबांची प्रतिक्रिया
नीरज चोप्राच्या आई-बाबांनी प्रतिक्रिया दिली की, “आम्ही खूप आनंदी आहोत. "चांदी आम्हाला सोन्यासारखी आहे." त्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांना नदीमबाबत विचारले असता, नीरजचे आई-बाबा म्हणाले की, तोही आमचाच मुलगा आहे. मेहनत करून सुवर्णपदक पटकावले आहे. प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. जेव्हा नीरज घरी येईल मी त्याला आवडते जेवण देईल", असे म्हणत नीरज चोप्राच्या आई-बाबांच्या प्रतिक्रियेने अनेकांची मने जिंकली आहेत.
अशातच आता नदीमच्या सुवर्णपदकावर वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर चिटिंगचे काही आरोप होत आहेत. अर्शद नदीमची डोप टेस्ट करण्याची मागणी होत आहे. जॅवलिन थ्रो स्पर्धेत नदीमने सहा वेळा प्रयत्न केला होता. त्यात ६ वेळा भालाफेकीचा प्रयत्न झाला आहे. त्यातील पहिला थ्रो हा फोल ठरला. त्यानंतर दुसऱ्या वेळी नदीमने ९२. ९७ मीटर भाला फेकण्याची कामगिरी केली. दरम्यान, १६ वर्षांपूर्वी म्हणजेच २००८ बीजिंग ऑलिम्पिकमधील अनेक रेकॉर्ड त्याने ब्रेक केले आहेत. दरम्यान, अर्शदच्या कामगिरीवर नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला नीरज चोप्रा?
रौप्य पदक मिळाल्यानंतर नीरज चोप्राने प्रतिक्रिया दिली आहे. नीरज म्हणाला की, जेव्हा आपण देशासाठी जिंकतो तेव्हा आपण आनंदी होतो. आम्ही बसून यावर चर्चा करू, कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करू, असे नीरज चोप्रा म्हणाला. भारत जिंकला, प्रत्येक खेळाडूचा एक दिवस असतो. आज अर्शद नदीमचा दिवस होता, असे नीरज म्हणाला.